Powered By Blogger
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

माझ्याबद्दल

माझा फोटो
I am Amit,Pure INDIAN man. Live in Varzadi bk,Sangamner tel,A,nagar dist,Maharastra State. I like Envorment,Net,Friends n' ...... Thanks you!

Archivo del blog

बुधवार, २३ मार्च, २०११

जीवन हे असच असतं...

मनात खुप काही सांगण्यासारखं असतं,
पण....
काहीवेळा शांत बसणंच बरं असतं,
आपल दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल,
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असतं,
ते आपलं असलं तरी इतरांसाठीच जगावं लागतं...

सोमवार, २१ मार्च, २०११

कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥

हसता हसता डोळे अलगत येतील भरुन ।
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन ।
कावरं-बावरं होण्यासारखं काही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही ॥
रस्त्यामध्ये दिसतात कितीतरी चेहरे येता जाता ।
एकसारखेच दिसु लागतिल सहज बघता बघता ।
अवतीभोवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ।
सृष्टीमध्ये दोनच जिव आणखी कोणी नसेल ।
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही ॥
कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥

-अमित कदम

मंगळवार, ८ मार्च, २०११

मराठी बाणा

हे मराठी मना,
घाबरु नको जना,
कर सिंहगर्जना,
आणि
दाखव मराठी बाणा..

जय महाराष्ट्र ॥