Powered By Blogger
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

माझ्याबद्दल

माझा फोटो
I am Amit,Pure INDIAN man. Live in Varzadi bk,Sangamner tel,A,nagar dist,Maharastra State. I like Envorment,Net,Friends n' ...... Thanks you!

Archivo del blog

बुधवार, २३ मार्च, २०११

मराठीची दुर्दशा

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल...
मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...
इंग्रजीच्या पेपरात होतो वर्ग सारा पास...
पण
मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या...
अन्
आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...
माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड...
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...
भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका...
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...
मराठी ऑक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...
ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा...
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...
सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी...
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

मैत्री म्हणजे...

मैत्री म्हणजे सुंदर पहाट...
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट...
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं...
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न...
फुलणारं-हसणारं प्रत्येक फूल कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं...
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ...
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ...
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन्
जणु दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला...
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऐकत रहावी अशी हरीची बासरी...
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी...
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी...
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात...
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ...
सोबत रहा तू फक्त...
इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

तुझी आठवण येते...

जीवन हे असच असतं...

मनात खुप काही सांगण्यासारखं असतं,
पण....
काहीवेळा शांत बसणंच बरं असतं,
आपल दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल,
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असतं,
ते आपलं असलं तरी इतरांसाठीच जगावं लागतं...

सोमवार, २१ मार्च, २०११

कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥

हसता हसता डोळे अलगत येतील भरुन ।
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन ।
कावरं-बावरं होण्यासारखं काही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही ॥
रस्त्यामध्ये दिसतात कितीतरी चेहरे येता जाता ।
एकसारखेच दिसु लागतिल सहज बघता बघता ।
अवतीभोवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ।
सृष्टीमध्ये दोनच जिव आणखी कोणी नसेल ।
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही ॥
कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥

-अमित कदम

मंगळवार, ८ मार्च, २०११

मराठी बाणा

हे मराठी मना,
घाबरु नको जना,
कर सिंहगर्जना,
आणि
दाखव मराठी बाणा..

जय महाराष्ट्र ॥